माझी (अशीच एक) कविता ... अभंग म्हणा हवं तर 😃 ....
(१८ जानेवारी, २०१४)
(Do like and comment!)
पठार ते कास
फुले खास खास
नसे त्यांस वास
सुंदर परि ।। १।।
ऑगस्टचा मास
क्याम्येरा झकास
लागे मग आस
फुले पाहू ।।२।।
पुणे दोन तास
लांबचा प्रवास
घेऊनि हा त्रास
नेत्र सुखी ।।३।।
सतत पाऊस
कधी जोरकस
ना तमा आम्हांस
सौंदर्य निरखी ।।४।।
फुलांची चादर
दिसे क्षितिजापार
बघण्या सान थोर
होती गोळा ।।५।।
कधी निळीशार
कधी श्वेत असे झालर
लाल पिवळा प्रसार
एकरंगी ।।६।।
रंगबदल सतत
कंद फुलति अविरत
छंद जोपासावा नित
फोटो काढण्या ।।७।।
जुळवि यमक् प्रास
होई जनां त्रास
आता करू बास
कविता ही ।।८।।
~कवी अमित