न्यूझीलंड vs बांगलादेश ODI, चॅम्पियन्स ट्रॉफी, 9 जून 2017
~अमित कालेकर
(Do like and comment!)
जिंकायला 266 रन्स हव्यात, समोर न्यूझीलंडसारखा प्रबळ प्रतिस्पर्धी, 11व्या ओव्हरमध्ये 4 विकेट्स किरकोळ 34 रन्स मध्ये पडलेल्या, खेळपट्टी आणि वातावरण वेगवान स्विंग गोलंदाजांना पूर्ण अनुकूल (टीम साउदी तोवर 4 ओव्हर्स टाकून 3 विकेट्स गटकावून बसलेला, आणि 4थी विकेट ट्रेंट बोल्टला!). अश्यात धावगती जवळजवळ 6 ला पोचलेली (38.2 ओव्हर्स, 232 रन्स हव्यात).
अश्या परिस्थितीत कुठल्याही संघाचे काय मनोधैर्य असेल???
पण हा सामना चक्क ह्या स्थितीतून बांगलादेशाने जिंकला ! 5व्या विकेटसाठी (विश्व?)विक्रमी 224 रन्सची भागीदारी रचत चक्कचक्क 16 चेंडू आणि 5 विकेट्स शिल्लक ठेवून ते जिंकले! महमदुल्लाह (102*) आणि शकीब अल हसन (114, सामनावीर) ही त्या विक्रमवीरांची नावे. हॅट्स ऑफ.
आठवतंय का, (नाही म्हणा, तंगडंच तोडीन!) 1983 प्रुडेंशियल विश्वचषकात आपल्या 'कपिलदेव निखंज' नामक झंझावाताने चिल्लूपिल्लू झिम्बाब्वेविरुद्ध 18 जून 1983 ला इथं इंग्लंडातच (टर्नब्रिज वेल्स) 5 आऊट 17 अश्या (नेहमीच्याच) होप्लेस स्थितीतून (गावस्कर आणि श्रीकांत झिरो!) तळाच्या फलंदाजांना हाती धरून नाबाद 175 रन्स कुटत आपल्याला एकहाती विजय मिळवून दिलेला, आज हे दोघे बांगलादेशसाठी अहीकपिल - महीकपिल बनले!
Brief scores: New Zealand 265/8 in 50 overs (Ross Taylor 63, Kane Williamson 57; Mosaddek Hossain Saikat 3-13)
lost to
Bangladesh 268/5 in 47.2 overs (Shakib Al Hasan 114, Mahmudullah 102*; Tim Southee 3-45) by five wickets.