डॉ. लागूंची भेट!
~ अमित कालेकर, 26 मे 2018, वेताळ टेकडी, कोथरूड पुणे
(Do like and comment!)
ARAI टेकडीवर मी तसा नेहमीच जातो. तिथं अतिशय नित्यनेमाने ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व नटसम्राट डॉ. श्रीराम लागू संध्याकाळी येऊन एका ठरलेल्या बाकावर बसतात. आणि मला दिसतातही, पण मी त्यांना कधी डिस्टर्ब करायला जात नाही. पण काल वाटलं. मग त्यांना वाकून नमस्कार केला आणि त्यांच्या पायाशी बसलो. त्यांच्या शेजारी दीपा लागूही बसल्या होत्या ... दोघांनी माझी आस्थेने चौकशी केली. नावगाव विचारलं. कुठले तुम्ही? काय करता? वगैरे वगैरे.
'तुमच्याबरोबर एक फोटो काढू का' असं विचारल्यावर लगेच हो म्हणाले! दीपा लागूंनी लगेच केस सारखे करत छान पोझ दिली!
दीपा लागू म्हणाल्या,
तुम्ही रेग्युलर व्यायामाला येत नाही 😄 यायला पाहिजे तुम्ही. इतक्या जवळ राहता टेकडीच्या!
आपले सोनारानेच का कान टोचले पाहिजेत नेहमी?? 😟
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा