सोमवार, ११ ऑगस्ट, २०२५

नीले नीले अंबर पर ....

 नीले नीले अंबर पर

~ अमित कालेकर, 11 ऑगस्ट 2025



आपण सर्वांनी किशोरकुमारचं एक अप्रतिम गाणं 'नीले नीले अंबर पर' ऐकलं असेलच, मी तर पारायणे केलीत! 'कलाकार' ह्या 9 डिसेंबर 1983 ला प्रदर्शित झालेल्या, पण बॉक्स ऑफिसवर सपाटून मार खाल्लेल्या सिनेमातलं हे गाणं. श्रीदेवी आणि कुणाल गोस्वामी (मनोज कुमारचा चिरंजीव) ह्या जोडीवर चित्रित. कल्याणजी-आनंदजीनी संगीतबद्ध केलेली गाणी ह्यातली.

पण खरंतर हा 'कलाकार' एका तमिळ सिनेमाचा रीमेक. त्याचं नाव Payanangal Mudivathillai (मराठीत लिहिणं केवळ अशक्य!) जो 1 वर्ष आधी म्हणजे 1982 मध्ये रिलीज झालेला. त्याचं म्युझिक द ग्रेट ईलायराजाचं!

तर हे ते ओरिजिनल गाणं (Ilaya Nila Pozhigirathe): https://youtu.be/AsN_9uXAoNE?si=xf2NuMODVwKT8H7U. अजून एक ग्रेट आणि आपला आवडता अश्या SP बालसुब्रमण्यमने गायलेलं.

पण किशोरच्या हिंदी व्हर्शनला म्हणजे 'नीले नीले अंबर पर'ला तोडच नाही! किशोरने त्या गाण्याला काही वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलंय.

जी जी सेम सेम गाणी किशोर आणि इतर दुसऱ्या कुणी गायली, त्यांची आपण जर का तुलना केली (त्या सगळ्या ग्रेट गायकांची क्षमा मागून, पण किशोरप्रेमापुढं न राहवून) तर असं आढळतं, की त्या गाण्यांत किशोर निःसंशय उजवा ठरतो. आता हे फक्त मीच नाही, तर अजून एक ग्रेट, पटकथालेखक आणि गीतकार जावेद अख्तरही म्हणतो. त्यांची युट्यूबवर एक क्लिप आहे ती पहा हवंतर: https://youtu.be/B6Qcf2Amd20?si=X6hYJwrM2Jlrqzsf


(लेख आवडल्यास कंमेंट, शेअर करा! गूगल लॉगिन असल्याने अजून वेगळं लॉगिन करायची गरज नाही.) 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा